माझा राम सखा भाग २

 " माझा राम सखा "

भाग २

उत्सवात रोज मंत्रजागर , रामायण वाचन व तिन्ही त्रिकाळ आरती होते.

गुढीपाडवा ते रामनवमी रोज रामाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवुन छबिना निघतो.सायंकालीन रामाची पुजा झाली की रामाच्या उत्सव मुर्तीं  सभामंडपात  यजमानांकडुन आणुन  रामाची ' ' ' ' उत्कट साधुनी शिळा ' ही आरती होते. गणपती मंदिरासमोर सजवलेल्या  पालखीत रामाच्या उत्सवमूर्ती ठेवल्यावर  गणपतीची आरती झाल्यावर मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी मार्गस्थ होते. मानकरी ' ' ' ' ' 'सियावर रामचंद्र की जय' हा जयघोष करुन मानकरी पालखी घेऊन सज्ज होतात. इथे एक सुंदर परंपरा आहे पंचायतानांच्या पैकी प्रत्येक मंदिरात गुरुजी आरतीचे ताम्हण घेऊन गेल्यावरती तेथील आरती होऊसतोवर छबिना  ' रामा हो रामा ' च्या जयघोषात तेथे येवुन स्थिरावतो.पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. पालखी मंदिर प्रदक्षिणा करत असताना विठ्ठल मंदिर , शेषशायी विष्णु भगवान, दत्त मंदिर  या मंदिरातील आरत्या करत करत शंकर  मंदिरापाशी पालखी  आल्यावर काही क्षण स्थिरावते. रामाच्या पायाची तिर्थ असलेली गंगा यावेळी भक्तावंर हर गंगे भागिरथी म्हणत शिपंडतात , तसेच तिर्थ म्हणुन दिली जाते. शंकर मंदिरातील आरती झाल्यावर पालखी मारुतीची आरती होईपर्यंत दास मारुती मंदिरापाशी स्थिरावते.येथून आरती झाल्यावर खांदयावरील पालखी हातावरुन सभामंडपात घेवुन येतात.प्रदक्षिणा करुन सभामंडपात पालखी स्थिरावते ; मग येथे पांडुरंगाची , ज्ञानेश्वर महाराजांची व तुकाराम महाराजांची आरती करुन रामाचा जयघोष केला जातो.पालखीतील रामाच्या उत्सवमूर्ती  या यजमानाकडून  गाभार्‍यात नेल्या जातात.गुरुजीकंडून मंत्रजागर होवुन त्या दिवसाची सांगता होते.

क्रमशः 

लेखक.एस.मुकूंद ©

Comments

Popular posts from this blog

माझा राम सखा

जिलब्या मारुती गणपती.