माझा राम सखा
" माझा राम सखा "
भाग १
आम्ही रहायला पुण्यात मध्यवर्ती भागात ( मुख्य पुणे ) तुळशीबाग राम मंदिराजवळच.पेशवेकालीन राम मंदिर व त्या मंदिरात थाटामाटात साजरा होणारा राम उत्सव म्हणजेच रामनवमी उत्सव.तुळशीबाग राम मंदिरात होणारा उत्सव म्हणजे सर्व रामभक्तांना एक पर्वणीच असते.
मी तुळशीबाग जवळच रहात असल्याने लहानपणापासुनच हा उत्सव अनुभव आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी राम लक्ष्मण सीता यास पवमानाच्या मंत्रोतघोषात व सनई चौघडाच्या साथीने श्रीरामनवमी नवरात्रास प्रारंभ होतो.उत्सवात रोज श्रीरामाला विवीध प्रकारचे पोषाख घातले जातात.तसेच पुर्वापार चालत आलेले पेशवेकालीन अलंकार श्रीरामाला परिधान केले जातात. पेशवेकालापासुन या मंदिरात त्रिकाळ नगारा वादन आजतागायत अविरत चालु आहे. दरवर्षी उत्सव काळातील नामांकिंत किर्तनकारांची किर्तन ऐकणे म्हणजे ही एक भाविकांसाठी पर्वणी असते.उत्सव काळात जेष्ठ , श्रेष्ठ गायक वादक आपली सेवा श्रीराम चरणी रुजु करतात.
क्रमश:
लेखक.एस.मुकूंद ©

Sundar
ReplyDelete