Posts

माझा राम सखा भाग २

Image
 " माझा राम सखा " भाग २ उत्सवात रोज मंत्रजागर , रामायण वाचन व तिन्ही त्रिकाळ आरती होते. गुढीपाडवा ते रामनवमी रोज रामाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवुन छबिना निघतो.सायंकालीन रामाची पुजा झाली की रामाच्या उत्सव मुर्तीं  सभामंडपात  यजमानांकडुन आणुन  रामाची ' ' ' ' उत्कट साधुनी शिळा ' ही आरती होते. गणपती मंदिरासमोर सजवलेल्या  पालखीत रामाच्या उत्सवमूर्ती ठेवल्यावर  गणपतीची आरती झाल्यावर मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी मार्गस्थ होते. मानकरी ' ' ' ' ' 'सियावर रामचंद्र की जय' हा जयघोष करुन मानकरी पालखी घेऊन सज्ज होतात. इथे एक सुंदर परंपरा आहे पंचायतानांच्या पैकी प्रत्येक मंदिरात गुरुजी आरतीचे ताम्हण घेऊन गेल्यावरती तेथील आरती होऊसतोवर छबिना  ' रामा हो रामा ' च्या जयघोषात तेथे येवुन स्थिरावतो.पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. पालखी मंदिर प्रदक्षिणा करत असताना विठ्ठल मंदिर , शेषशायी विष्णु भगवान, दत्त मंदिर  या मंदिरातील आरत्या करत करत शंकर  मंदिरापाशी पालखी  आल्यावर काही क्षण स्थिरावते. रामाच्या पायाची तिर्थ असलेली गंगा यावेळी भक्त...

माझा राम सखा

Image
 " माझा राम सखा "   भाग १      आम्ही रहायला पुण्यात मध्यवर्ती भागात ( मुख्य पुणे ) तुळशीबाग राम मंदिराजवळच.पेशवेकालीन राम मंदिर व त्या मंदिरात थाटामाटात  साजरा होणारा राम उत्सव म्हणजेच रामनवमी उत्सव.तुळशीबाग राम मंदिरात होणारा उत्सव म्हणजे सर्व रामभक्तांना एक पर्वणीच असते.     मी तुळशीबाग जवळच रहात असल्याने लहानपणापासुनच हा उत्सव अनुभव आहे.गुढीपाडव्याच्या  दिवशी सकाळी राम लक्ष्मण सीता यास पवमानाच्या मंत्रोतघोषात व सनई चौघडाच्या साथीने श्रीरामनवमी नवरात्रास प्रारंभ होतो.उत्सवात रोज श्रीरामाला विवीध प्रकारचे पोषाख घातले जातात.तसेच पुर्वापार चालत आलेले पेशवेकालीन अलंकार श्रीरामाला  परिधान केले जातात. पेशवेकालापासुन या मंदिरात त्रिकाळ नगारा वादन आजतागायत अविरत चालु आहे. दरवर्षी उत्सव काळातील नामांकिंत किर्तनकारांची किर्तन ऐकणे म्हणजे ही एक भाविकांसाठी पर्वणी असते.उत्सव काळात जेष्ठ , श्रेष्ठ गायक वादक आपली सेवा श्रीराम चरणी रुजु करतात. क्रमश:  लेखक.एस.मुकूंद ©

जिलब्या मारुती गणपती.

Image
 आजच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आताच्या मंडई शनिपार रोडवर २५० ते ३०० वर्षापुर्वी अंबिल ओढा वाहत होता.तो शुक्रवार, सदाशिव ,बुधवार ,शनिवार पेठेतुन  वाहत जाऊन मुठा मुळा नदिस मिळाला होता.ह्याच ओढ्याकाठी मंडई शनिपार रोडवर पुर्वी एका वाडीची स्मशानभूमी होती.तिथे एक मारुतीचे देऊळ होते व ते आज पण आहे.त्याला पुर्वी विसावा मारुती म्हणत त्याचे  कारण लोक त्या ठिकाणी कायमचा विसावा घेत म्हणजे मेललेल्या माणसाला जाळत त्या ठिकाणी.तसेच ह्या ठिकाणी पूर्वी पती निधनानंतर स्त्रिया पती देहाबरोबर सती जात असत.ह्याच मारुती शेजारी सरदार शितोळे घराण्यातील एक स्त्री सती गेली होती.तिचे स्मारक आहे.पुढे पेशवाईत वस्ती वाढु लागल्यावर हे स्मशान ह्या ठिकाणाहुन दुसरीकडे हलवले गेले. व तो ओढा बुजवला गेला.पण सतीचे स्मारक व मारुतीचे मंदिर तसेच राहिले.या भागात वस्ती वाढल्यावर या देवळाच्या आजुबाजुला घरे , दुकाने आली.त्यात या मंदिराच्या बाजुला एका हलवाईचे दुकान होते . तो दुकानात रोज पहिली जिलबी बनवल्यावर ११ किंवा २१ जिलबींचा हार मारुतीला घालायचा व आपल्या व्यवसायाला सुरुवात करायचा.म्हणुन विसावा मारुती नाव जाऊन...