जिलब्या मारुती गणपती.
आजच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आताच्या मंडई शनिपार रोडवर २५० ते ३०० वर्षापुर्वी अंबिल ओढा वाहत होता.तो शुक्रवार, सदाशिव ,बुधवार ,शनिवार पेठेतुन वाहत जाऊन मुठा मुळा नदिस मिळाला होता.ह्याच ओढ्याकाठी मंडई शनिपार रोडवर पुर्वी एका वाडीची स्मशानभूमी होती.तिथे एक मारुतीचे देऊळ होते व ते आज पण आहे.त्याला पुर्वी विसावा मारुती म्हणत त्याचे कारण लोक त्या ठिकाणी कायमचा विसावा घेत म्हणजे मेललेल्या माणसाला जाळत त्या ठिकाणी.तसेच ह्या ठिकाणी पूर्वी पती निधनानंतर स्त्रिया पती देहाबरोबर सती जात असत.ह्याच मारुती शेजारी सरदार शितोळे घराण्यातील एक स्त्री सती गेली होती.तिचे स्मारक आहे.पुढे पेशवाईत वस्ती वाढु लागल्यावर हे स्मशान ह्या ठिकाणाहुन दुसरीकडे हलवले गेले. व तो ओढा बुजवला गेला.पण सतीचे स्मारक व मारुतीचे मंदिर तसेच राहिले.या भागात वस्ती वाढल्यावर या देवळाच्या आजुबाजुला घरे , दुकाने आली.त्यात या मंदिराच्या बाजुला एका हलवाईचे दुकान होते . तो दुकानात रोज पहिली जिलबी बनवल्यावर ११ किंवा २१ जिलबींचा हार मारुतीला घालायचा व आपल्या व्यवसायाला सुरुवात करायचा.म्हणुन विसावा मारुती नाव जाऊन कालांतराने जिलब्या मारुती हे नाव पडले.व तेच नाव आजपावेतो सुरु आहे.ह्याच देवाळाशेजारी ६७ वर्षापुर्वी या भागातील गणेशभक्त तरुणांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सुरु करुन गणपतीला पण या मारुतीचे म्हणजे श्री.जिलब्या मारुती मंडळ असे नाव दिले. पुर्वी मारुती हा राक्षसावर पाय ठेवुन उभा होता म्हणजेच राक्षसाला मारतानाची मुर्ती होती पण काही लोकांना वाटली की हि मुर्ती भंगली आहे म्हणुन आताची मुर्ती बसवली गेली.पण पुर्वीची मुर्ती ही भंगली गेली अशी वाटुन ती पुर्वी जंगल भाग समजल्या जाणर्या नातुबाग परिसरात ठेवली व तेथे काही तरुण फिरायला आले असताना त्यांच्या नजरेस पडलीये व ति त्यांनी ती पुर्ण निरखुन बघितली असता त्यांना असे जाणवले की ती मुर्ती भंगली नसुन राक्षसावर पाय ठेवुन उभी आहे.ती मुर्ती आज पर्वती पायथा येथे स्थापन केलेली आहे.





Comments
Post a Comment