माझा राम सखा भाग २
" माझा राम सखा " भाग २ उत्सवात रोज मंत्रजागर , रामायण वाचन व तिन्ही त्रिकाळ आरती होते. गुढीपाडवा ते रामनवमी रोज रामाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवुन छबिना निघतो.सायंकालीन रामाची पुजा झाली की रामाच्या उत्सव मुर्तीं सभामंडपात यजमानांकडुन आणुन रामाची ' ' ' ' उत्कट साधुनी शिळा ' ही आरती होते. गणपती मंदिरासमोर सजवलेल्या पालखीत रामाच्या उत्सवमूर्ती ठेवल्यावर गणपतीची आरती झाल्यावर मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी मार्गस्थ होते. मानकरी ' ' ' ' ' 'सियावर रामचंद्र की जय' हा जयघोष करुन मानकरी पालखी घेऊन सज्ज होतात. इथे एक सुंदर परंपरा आहे पंचायतानांच्या पैकी प्रत्येक मंदिरात गुरुजी आरतीचे ताम्हण घेऊन गेल्यावरती तेथील आरती होऊसतोवर छबिना ' रामा हो रामा ' च्या जयघोषात तेथे येवुन स्थिरावतो.पालखीच्या दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. पालखी मंदिर प्रदक्षिणा करत असताना विठ्ठल मंदिर , शेषशायी विष्णु भगवान, दत्त मंदिर या मंदिरातील आरत्या करत करत शंकर मंदिरापाशी पालखी आल्यावर काही क्षण स्थिरावते. रामाच्या पायाची तिर्थ असलेली गंगा यावेळी भक्त...